बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने “बच्चन पांडे’चे शूटिंग पूर्ण केले असून तो आता आपल्या आगामी “राम सेतु’ चित्रपटाच्या तयारीत आहे. अक्षय कुमार हा 18 मार्च रोजी राम जन्मभूमि असलेल्या अयोध्येला जावून तेथूनच “राम सेतु’ चित्रपटाच्या शुभारंभ करणार असल्याचे समजते. चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक शर्मा आणि क्रिएटिव्ह प्रोड्यूसर चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्यासह अक्षय कुमार हा 18 मार्चला अयोध्येला जाणार आहे.
राम जन्मभूमि असलेल्या या ठिकाणीच चित्रपटातील पहिला शॉट शूट करण्यात येणार आहे. अक्षय सध्या मालदीवमध्ये आपल्या कुटुंबियांसह सुट्टीचा आनंद घेत आहे. तेथून परतल्यावर तो लवकरच या प्रोजेक्टवर काम सुरू करणार आहे. पुढील काही महिन्यांमध्ये चित्रपटातील शेड्यूल शूट करण्यात येणार आहे. या चित्रपटातील 80 टक्के शूटिंग मुंबईत होणार आहे.
दरम्यान, या चित्रपटाची घोषणा गतवर्षी दिवाळीला करण्यात आली होती. हा एक मिथोलॉजिकल ड्रामा चित्रपट असून तो पुढील वर्षी दिवाळीला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
“राम सेतु’मध्ये अक्षय कुमारसह जॅकलीन फर्नांडिस आणि नुसरत भरूचा मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अक्षय कुमारचा नवीन अवतार चाहत्यांना पाहावयास मिळणार आहे. या चित्रपटाची घोषणा केल्यापासूनच चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.