बॉलिवूडचा खिलाडी अशी ओळख असलेला अभिनेता अक्षय कुमार याला चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत झाली आहे. हाऊसफुल 5 च्या सेटवर स्टंट करत असताना अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. स्टंट दरम्यान अक्षयच्या डोळ्यावर एक वस्तू आदळल्याने ही दुखापत झाल्याचे समजत आहे.
ही घटना घडताच सेटवर ताबडतोब एका नेत्ररोग तज्ज्ञाला बोलावण्यात आलं, ज्याने त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्याला विश्रांती घेण्यास सांगितलं. तर इतर कलाकारांसोबत शूट पुन्हा सुरू झालं. दुखापतीनंतरही, अक्षय लवकरच शूटिंगमध्ये सामील काही दिवसात जॉईन होईल. कारण चित्रपट शूटिंगच्या अंतिम टप्प्यात आहे आणि त्याला उशीर होऊ नये अशी त्याची इच्छा आहे.
अभिषेक बच्चन, श्रेयस तळपदे, चंकी पांडे, जॅकलीन फर्नांडिस आणि नर्गिस फाखरी यांच्या पुनरागमनासह अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांचा आगामी कॉमेडी हाऊसफुल 5 प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे.
यामध्ये फरदीन खान, डिनो मोरिया, जॉनी लीव्हर, संजय दत्त, नाना पाटेकर, सोनम बाजवा, चित्रांगदा सिंग, सौंदर्या शर्मा आणि ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ असणार आहेत. तरुण मनसुखानी दिग्दर्शित, हाऊसफुल 5 हा चित्रपट 6 जून 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.