मुंबई – बॅक-टू-बॅक ब्लॉकबस्टर्स चित्रपट देणारा बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसचा किंग ठरला आहे. अक्षयसाठी 2019 हे वर्ष खूप चांगले राहिले. गतवर्षी त्याचे केसरी, मिशन मंगल, हाऊसफुल 4 आणि गुड न्यूज सारख्या चित्रपटांनी कमाईच्या बाबतीत अन्य कलाकारांना मागे टाकले होते. मागील वर्ष बॉलिवुडचा खिलाडी अक्षय कुमार बॉक्स ऑफिसवरही किंग ठरला होता.
यातच, नवीन कॉन्सेप्ट सोबत खिलाड़ी कुमार ने एन्ट्री केली आहे. रक्षा बंधन निमित्त अक्षयच्या ‘रक्षा बंधन’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरमध्ये अक्षय चार बहिणींना गला भेट घेतांना दिसत आहे. तसेच ‘बस बहनें देती हैं 100 फीसदी रिटर्न…’ असं म्हणत अक्षय कुमारच्या पोस्टर मध्ये बहीण भावाचे प्रेमळ नाते दाखविण्यात आले आहे. हा चित्रपट आनंद एल राय डायरेक्ट करत आहे , तर या चित्रपटाचे लेखन हिमांशु शर्माने केले आहे. 5 नोव्हेबर ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दरम्यान, खिलाडीकुमार एका वर्षामध्ये जवळपास 3 ते 4 चित्रपट घेऊन येतोच. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील कमालीचे हिट ठरतात. अक्षय कुमार लवकरच “सूर्यवंशी’, “लक्ष्मी बम’, “बेलबॉटम’, “बच्चन पांडे’ आणि “पृथ्वीराज’ या सिनेमामध्ये दिसणार आहे.