मुंबई – बॉलीवूड स्टार अक्षय कुमार आपल्या आगामी ‘सेल्फी’ चित्रपटासाठी 1994 मध्ये आलेलं ‘मैं खिलाडी तू अनाडी’ हे गाणं पुन्हा एकदा नव्या ढंगात प्रेक्षकांसमोर आणणार आहे. या चित्रपटात तो पुन्हा एकदा पूर्णपणे नवीन स्टाईलमध्ये डान्स करताना दिसणार आहे. याची झलक त्याने आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे.
अक्षय कुमारने एक जबरदस्त व्हिडीओ शेअर केला आहे. वास्तविक, हा व्हिडिओ शेअर करताना त्याने ‘मैं खिलाडी तू अनाडी’मधील त्याचा सहकलाकार सैफ अली खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता सैफने नुकताच त्याचा 52 वा वाढदिवस साजरा केला. अक्षयने आपल्या सहकाऱ्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिल्याचे पाहायला मिळते.
सैफ अली खान आणि अक्षय कुमार यांनी 28 वर्षांपूर्वी ‘मैं खिलाडी तू अनाडी’मध्ये एकत्र काम केले होते. तो चित्रपट आणि त्यातील गाणी सुपरहिट झाली आणि आजही खूप ऐकली जातात. अक्षयने इंस्टाग्रामवर या गाण्यावर डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “‘सेल्फी’साठी ‘मैं खिलाडी तू अनाडी’च्या धूनवर पुन्हा नाचणे अजूनही उत्तम आठवणींना उजाळा देते. खासकरून जेव्हा मूळ चित्रपटातील माझा पार्टनर-इन-क्राइम सैफ अली खानचा वाढदिवस असतो. तो सोशल मीडियावर नाही पण तरीही शुभेच्छा पोहोचतात. ब्रदर वाढदिवसाच्या शुभेच्छा!”
View this post on Instagram
अक्षय कुमारसोबत ‘सेल्फी’मध्ये इमरान हाश्मी आणि नुसरत भरुचा देखील आहेत. याशिवाय अक्षय ‘राम सेतू’, ‘OMG 2- Oh My God! 2’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि तमिळ चित्रपट ‘सूरराई पोत्रू’चा हिंदी रिमेकमध्ये देखील झळकणार आहे.