Akshay Kumar : अभिनेता अक्षय कुमारचे मागील काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यात अपयशी ठरले आहेत. यावर्षी देखील त्याचे अनेक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सध्या अक्षय त्याचा नवीन चित्रपट ‘स्काय फोर्स’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्याने लोकप्रिय हॉरर कॉमेडी चित्रपट ‘भुल भुलैया’ फ्रेंचाइजीचा भाग का नाही याचे कारण सांगितले आहे.
2007 साली आलेल्या ‘भुल भुलैया’ या चित्रपटात अक्षय कुमारचे प्रमुख भूमिका होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला. यातील डायलॉग्स, पात्र आजही लोकप्रिय आहेत. मात्र, त्यानंतर आलेल्या ‘भुल भुलैया 2’ आणि ‘भुल भुलैया -3’ या दोन्ही चित्रपटात अक्षय कुमार नव्हता.
अक्षय कुमारच्या जागी या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यनने प्रमुख भूमिका साकारली होती. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाईचा मोठा आकडा गाठला असला तरीही अक्षय या चित्रपटाचा भाग का नव्हता? याबाबत चाहत्यांकडून सातत्याने विचारणा केली जाते. आता याबाबत अक्षयने स्वतः खुलासा केला आहे.
‘स्काय फोर्स’च्या प्रमोशन दरम्यान एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ‘भुल भुलैया’ फ्रेंचाइजीचा भाग का नाही याचे उत्तर त्याने दिले. ‘बेटा, मला काढून टाकले होते. बस्स एवढंच.’, असे म्हणत अक्षयने या लोकप्रिय फ्रेंचाइजीचा भाग नसण्यामागचे कारण सांगितले.
यावेळी बोलताना अभिनेत्याने हेरा फेरी 3 बद्दलही माहिती. ‘हेरा फेरी 3 सुरू होण्याची मी पण वाट पाहत आहे. मला माहिती नाही, पण सर्वकाही सुरळीत झाले तर ते यावर्षी शूटिंग सुरू होईल.’, असे अक्षय म्हणाला. दरम्यान, अक्षयचा ‘स्काय फोर्स’ हा चित्रपट 24 जानेवारी 2025 ला रिलीज होणार आहे. यासोबतच, तो ‘वेलकम टू द जंगल’, ‘कनप्पा’, ‘हाउसफुल 5’, ‘जॉली एलएलबी 3’ या चित्रपटातही झळकणार आहे.