Lara Dutta : अभिनेत्री लारा दत्ता हिने बॅालिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. सध्या लारा बॅालिवूडमध्ये फारशी सक्रिय नसते. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमुळे ती चर्चेत आली आहे. मुलाखतीत तिने स्वतःसोबत घडलेल्या एका भयानक घटनेची आठवण सांगितली. लाराने अक्षय कुमारसोबत ‘अंदाज’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. अलीकडेच एका मुलाखतीत लाराने एका अशा घटनेबद्दल सांगितले, ज्यात तिचा जीव जाता जाता वाचला, पण तिचा सहकलाकार अक्षय कुमारने तिला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. ‘अंदाज’च्या चित्रीकरणादरम्यान घडली घटना Lara Dutta एशियन टेलिव्हिजन नेटवर्क कॅनडाशी बोलताना, लाराने तिच्या कारकिर्दीतील एका अत्यंत भयावह अनुभवाची आठवण सांगितली. अभिनेत्रीने सांगितले की, एका नृत्य दृश्याचे चित्रीकरण करत असताना एका मोठ्या लाटेने तिला आणि तिचा सहकलाकार अक्षय कुमारला समुद्रात ओढून नेले. हा अपघात ‘अंदाज’च्या चित्रीकरणादरम्यान घडला होता. Lara Dutta : अक्षय कुमार ठरला देवदुत! लारा दत्ताला मृत्यूच्या दाढेतून वाचवलं; अंदाज चित्रपटाच्या शूटिंगवेळी नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्रीने स्पष्ट केले, “मी चामड्याचे कपडे घालून पाण्यात उडी मारली. मला पोहता येत नव्हते आणि मी दगडासारखी बुडाले. यानंतर जे घडले ते आणखी वाईट होऊ शकले असते.” पाण्यात असलेल्या अक्षय कुमारने मला पकडले आणि किनाऱ्यावर परत आणले. त्यानंतर मला हायपोथर्मिया झाला होता. चित्रीकरण तात्काळ थांबवण्यात आले आणि मला रुग्णालयात दाखल करण्यात आले. लाराने पुढे सांगितले की, या घटनेचा तिच्यावर खूप खोलवर परिणाम झाला. जेव्हा अक्षय कुमारने नंतर ‘ब्लू’ या चित्रपटाच्या निर्मात्यांना तिचे नाव सुचवले, ज्यामध्ये समुद्राची आणि पाण्याखालील अनेक दृश्ये होती. तेव्हा लारा घाबरली आणि तिने नकार देण्याचा विचार केला. अभिनेत्रीने स्पष्ट केले की, तिने अक्षयला फोन करून सांगितले की ती हा चित्रपट करू शकत नाही. अक्षयने तात्काळ प्रतिक्रिया दिली, “पोहायला शिक.” त्यानंतर ही लारा पोहायला शिकली आणि तिने ब्लू चित्रपटात काम केले. ‘ब्लू’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अक्षय कुमारचाही अपघात Lara Dutta 2009 मध्ये प्रदर्शित झालेला ‘ब्लू’ हा एक जल-साहसी चित्रपट होता, ज्यामध्ये पाण्याखालील अनेक दृश्ये होती. ‘ब्लू’च्या चित्रीकरणात अनेक धोके होते, ज्यात पाण्याखालील खऱ्या शार्क माशांसोबतची दृश्येही समाविष्ट होती. चित्रपटाच्या क्लायमॅक्सदरम्यान अक्षय कुमार स्वतः थोडक्यात मृत्यूच्या दाढेतून बचावला. पाण्याखाली 150 फूट खोल असलेल्या एका बुडलेल्या जहाजावर त्याचे डोके आदळले आणि त्याला रक्तस्त्राव होऊ लागला, पण तो कसातरी पाण्याच्यावर आला. अक्षय कुमार आणि लारा दत्ता यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ब्लू’ या चित्रपटात संजय दत्त आणि झायेद खान हे कलाकारही होते. मोठ्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला. Lara Dutta हेही वाचा : US-Iran War: डोनाल्ड ट्रम्पचा युटर्न ! आधी इराणला संपवण्याची शपथ, आता होर्मुझच्या मुद्द्यावर युद्ध संपवण्याचा आग्रह