अक्षय कुमारच्या ‘केसरी’ सिनेमाची पहिल्या दिवशी झाली ‘इतकी’ कमाई

पुणे – बॉलीवूडमधील खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतिक्षित चित्रपट केसरी गुरूवारी धूलिवंदनच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईमध्ये चांगली सुरूवात केली आहे.

सारागढीच्या युद्धावर आधारीत केसरी या चित्रपटाने पहिल्या दिवशी जवळपास 21.50 कोटी रूपयांची कमाई केली आहे. तसेच येत्या दोन दिवसात शनिवार, रविवार सुट्ट्या असल्याने चित्रपटाच्या कमाईत चांगलीच वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ट्रेड ऍनालिस्ट आदर्श तरण यांनी या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईची माहिती ट्विट करून दिली आहे.

दरम्यान, केसरी हा एक युद्धपट असून याची कथा गिरीश कोहली आणि अनुराग सिंह यांनी लिहिली आहे. यात अक्षय कुमार सोबत अभिनेत्री परिणिती चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत. 36व्या शीख रेजिमेंटचे 21 सैनिक आणि दहा हजार अफगाण सैनिकांमध्ये झालेल्या सारागढीच्या युद्धावर “केसरी’ चित्रपट आधारित आहे. शेवटच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या त्या 21 सैनिकांची अविश्वसनीय शौर्यगाथा केसरीतून रुपेरी पडद्यावर दाखविण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.