आगामी “ओह माय गॉड 2’मध्ये अक्षय कुमार चक्क भगवान शंकराच्या रोलमध्ये दिसणार आहे. गेल्यावर्षी “तांडव’ या वेबसिरीजमध्ये मोहम्मद झिशान आयुबने भगवान शंकराचा रोल केला होता. त्याने हा रोल करण्यामुळे आणि त्याच्या तोंडी असलेल्या काही संवादांमुळे “तांडव’वादग्रस्त ठरली होती.
त्या वादानंतर भगवान शंकराचा रोल पडद्यावर साकारण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. “ओह माय गॉड-2’च्या शूटिंगचे लांबलचक शेड्युल अलीकडेच मुंबईमध्ये सुरू झाले आहे. या सिनेमाचे एक पोस्टर देखील रिलीज झाले आहे. त्यामध्ये अक्षय भगवान शंकराच्या वेशभूषेमध्ये दिसतो आहे. अक्षय कुमार सध्या खूप बिझी आहे.
त्याचे 5 सिनेमे रिलीजच्या वाटेवर आहेत. तर काही सिनेमांचे शूटिंग वेगाने सुरू झाले आहे. त्यामुळे आगामी काही महिन्यात बॉक्स ऑफिसवर अक्षयच्याच सिनेमांची रांग लागलेली असणार आहे. “बेलबॉटम’ आणि “लक्ष्मी’ या दोन सिनेमांचा परिणाम फारसा काही सकारात्मक राहिलेला नव्हता. त्यामुळे अक्षयला आपल्या आगामी सर्व सिनेमांकडून चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा असणे स्वाभाविक आहे.