अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ची परदेशात ‘धमाल’; जाणून घ्या किती झाली ‘कमाई’

नवी दिल्ली – बाॅलिवूड स्टार अक्षय कुमारचा नुकताच ‘लक्ष्मी’ चित्रपट 9 नोव्हेंबर रोजी भारतात ओटीटी प्लॅटफाॅर्मवर रिलीज झाला आहे. भारतात या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र परदेशात या चित्रपटानं मोठी कमाई केलीय.

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ चित्रपट भारतासह ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, फिजी, पापुआ न्यू गिनी आणि यूएई मध्ये रिलीज झालाय. परदेशात या चित्रपटानं कोरोनाच्या काळात देखील चांगली कमाई केली आहे.

चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनी सांगितले की, ‘लक्ष्मी’ने यूएईमध्ये रिलीज झाल्यानंतर तब्बल 1.46 कोटीची कमाई केलीय. तसेच फिजीत 17.46 लाख, ऑस्ट्रेलियात 70.48 लाख, पापुआ न्यू गिनीमध्ये 18 लाख आणि न्यूझिलंड मध्ये 42.38 लाख रूपये कमवले आहेत.

तसेच भारतात ओटीटी प्लॅटफाॅर्म डिज्नी प्लस हाॅटस्टारवर प्रदर्शित होणारा लक्ष्मी सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे.

या चित्रपटात अक्षय कुमारने एक अशी व्यक्तीरेखा साकारलीय ज्यात एका तृतीयपंथीचा आत्मा येतो. अक्षय कुमारसह या चित्रपटात कियारा अडवाणी, अश्विनी काळसेकर, राजेश शर्मा, आयसा रजा आणि मुन ऋषी यांनी मुख्य भूमिका बजावली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राघव लाॅरेंस यांनी केले असून हा चित्रपट तमिळ च्या कंचना चित्रपटाचा रिमेक आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.