VIDEO: अक्षय कुमारची बीएसएफ जवानांसोबत धमाल

दिल्ली – ‘केसरी’ हा अक्षय कुमारचा आगामी चित्रपट उद्या प्रदर्शित होत आहे. अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा हे सध्या आपल्या  चित्रपटाचे प्रमोशन करीत असून नुकतेच त्यांनी दिल्लीत बीएसएफ जवानांची भेट घेतली. या भेटीत अक्षय आणि परिणीती यांनी जवानांसोबत धमाल करत  डान्स देखील केला. यानंतर खिलाडी कुमारने बीएसएफच्या महिला जवान यांच्यासोबत मुक्केबाजीचा सराव करत असल्याचा व्हिडीओ देखील आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.

परिणीती चोप्रा आणि अक्षय कुमार यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका केली असून अनुराग सिंह यांनी दिग्दर्शन केले आहे, तर या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शनने केली आहे. हा चित्रपट ३६ व्या शीख रेजिमेंटचे २१ सैनिक आणि दहा हजार अफगाण सैनिकांमध्ये झालेल्या सारागढीच्या युद्धावर आधारीत आहे.

अक्षय कुमारची बीएसएफ जवानांसोबत धमाल

'केसरी' हा अक्षय कुमारचा आगामी चित्रपट उद्या प्रदर्शित होत आहे. अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा हे सध्या आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करीत असून नुकतेच त्यांनी दिल्लीत बीएसएफ जवानांची भेट घेतली. या भेटीत अक्षय आणि परिणीती यांनी जवानांसोबत धमाल करत डान्स देखील केला. यानंतर खिलाडी कुमारने बीएसएफच्या महिला जवान यांच्यासोबत मुक्केबाजीचा सराव करत असल्याचा व्हिडीओ देखील आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.

Posted by Digital Prabhat on Wednesday, 20 March 2019

 

Leave A Reply

Your email address will not be published.