सोनाक्षी सिन्हाने केली अक्षय कुमारची पाठराखण

बॉलीवूडमधील सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमार याच्या एका जुन्या मुलाखतीचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. ही मुलाखत 2012 मधील आहे. त्यावेळी अक्षय कुमार याने “रावडी राठोड’ या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी मुलाखत दिली होती.

या मुलाखतीत त्याची को-स्टार सोनाक्षी सिन्हा आणि असिनबाबत त्याला विचारले असता तो म्हणाला, सोनाक्षी ही उत्कृष्ट अभिनेखी असून तिच्या अभिनयाची एक वेगळीच स्टाईल आहे. तिची फिगर एकदम वेगळी असून ती टिपिकल इंडियन फिगर नसून झिरो फिगरही नाही.

अक्षय पुढे म्हणाला, ती खात्या-पित्या घरातील आहे. मी शुद्ध पंजाबी आहे. मला त्याच अभिनेत्री आवडतात ज्या “हरी-भरी’ आहेत, न की “चुसा हुआ आम’. या वक्‍तव्यावरून अक्षयला खूप ट्रोल करण्यात आले होते. ही मुलाखत आता पुन्हा एकदा व्हायरल झाली आहे.

मात्र, यावेळी अक्षयचा बचाव करण्यासाठी खुद्‌द सोनाक्षी सिन्हाने पुढाकार घेतला आहे. सोनाक्षी म्हणाली, ट्रोल करणा-यांकडे काही चांगले काम करण्याची प्रवृत्ती नसल्याने ते असे रिकाम टेकडे काम करत आहेत. लोकांनी हे समजुन घेतले पाहिजे की, मला करिअरच्या सुरुवातील खुप बॉडी शेम करण्यात आले होते. यासाठी मी 30 किलो वजनही कमी केले होते, असे म्हणत तिने अक्षय कुमारची पाठराखन केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)