अक्षय साकारतोय पृथ्वीराज चौहान यांची भूमिका

अभिनेता अक्षय कुमारने आपल्या 52 व्या वाढदिवशी शूर योद्धा आणि राजा पृथ्वीराज चौहान यांच्या बायोपिकची घोषणा केली आहे. “पृथ्वीराज’ असे चित्रपटाचे नाव असून 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. “वाढदिवशी माझ्या पहिल्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा करताना मला आनंद होत आहे. शूर योद्धा, सम्राट पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारणे हे मी भाग्य समजतो. हा माझा सर्वात मोठा चित्रपट आहे’, असे अक्षय कुमार यावेळी म्हणाला.

अक्षयने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या सिनेमाची घोषणा केली. त्याने ही घोषणा करत एक ट्‌विट केले, ज्यात तो म्हणाला की, “पराक्रम आणि मूल्य असलेल्या आणि ज्यांचा मी खूप आदर करतो असा हिरो साकारण्याची संधी मिळणे खूप मोठी गोष्ट आहे. सम्राट पृथ्वीराज चौहान हा माझा सगळ्यात महत्त्वाचा सिनेमा आहे…’ या पोस्टमध्ये त्याने सिनेमाच्या लोगो रिव्हीलचा व्हिडिओ पण पोस्ट केला आहे.

तसेच त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सुद्धा ही पोस्ट शेअर केली आहे. अक्षयच्या या पोस्टला भरभरुन प्रतिसाद मिळताना सध्या दिसत आहे. अक्षयच्या इंस्टावर तर या पोस्टला अवघ्या काही तासातच 7.6 लाखांच्यावर लाईक्‍स आले आहेत. यशराज फिल्म अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होणार असून डॉक्‍टर चंद्र प्रकाश द्विवेदी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×