अक्षय आणि कतरिना 9 वर्षांनंतर ‘या’ सिनेमात दिसणार एकत्र

एकेकाळी अक्षय कुमार आणि कतरिना या जोडीचा बॉलिवूडमध्ये डंक होता. या दोघांनी अनेक्‍ह्हिट सिनेमांमध्ये काम केले आहे. “सिंग इज किंग’, “नमस्ते लंडन’ आणि “वेलकम’ या सिनेमामध्ये या जोडीला प्रेक्षकांनी चांगले पसंत केले होते. मात्र 2010 नंतर या दोघांनी कोणत्याही सिनेमामध्ये एकत्र काम केलेले नाही. यामागे कोणतेही कारण नव्हते. कतरिना सलमान, शाहरुखच्या सिनेमांमध्ये व्यस्त होती. तर अक्षय दक्षिणात्य “2.0′ सारख्या बिगबजेट सिनेमांमध्ये अडकला होता.

मात्र रोहित शेट्टीच्या “सूर्यवंशी’मध्ये हे दोघे पुन्हा एकत्र दिसणार आहेत. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान पुन्हा अक्षयबरोबर काम करताना कतरिनाला ते जुने दिवस आठवले. पूर्वी असलेली केमिस्ट्री अजूनही कायम असल्याची तिला जाणीव झाली. “सुर्यवंशी’ पुढच्य वर्षी ईदच्या मुहुर्तावर रिलीज केले जाणार आहे.

रोहित शेट्टीचे सिनेमे हे कॉप सिरीज म्हणजे पोलिस अधिकाऱ्यांच्या धाडसी कारनाम्यांचे म्हणून प्रसिद्ध असतात. त्याच्या या कॉप सिरीजमध्ये आतापर्यंत अजय देवगण, रणवीर सिंह दिसले आहेत. आता त्यांच्या रांगेमध्ये अक्षय कुमारही दिसणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.