दूध भेसळ रोखण्यासाठी कठोर पावले उचला

File Photo

उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची मागणी

अकोले – दूध भेसळ रोखण्यासाठी कठोर पावले उचला, अशी मागणी उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक डॉ अजित नवले यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली. देशभरात तब्बल 68 टक्‍के दुधात भेसळ होत असल्याचा केंद्रीय पशुकल्याण मंडळाचे सदस्य मोहनसिंग अहुवालिया यांनी केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने यापूर्वी या प्रश्नावर वारंवार आवाज उठविला आहे. आता सरकारी यंत्रणेतील अधिकाऱ्यांनीही दुधात भेसळ होत असल्याचे स्पष्ट केले आहे. याकडे लक्ष वेधून डॉ नवले यांनी या भेसळीमुळे सन 2025 पर्यंत 87 टक्‍के भारतीय कॅन्सर सारख्या गंभीर आजारांना बळी पडतील असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचा हवाला देऊन दिला आहे. आता या पार्श्‍वभूमीवर सरकारी यंत्रणेने हा प्रश्‍न गांभीर्याने घ्यावा अशी मागणी संघर्ष समितीच्या वतीने केली आहे.

राज्यात संघटीत व असंघटीत क्षेत्रात मिळून सरासरी प्रतिदिन 2 कोटी 80 लाख लिटर दुधाचे वितरण होते.दुधाचे शेतकऱ्यांकडून होणारे संकलन मात्र यापेक्षा कमी आहे. परराज्यातून येणारे दूध जमेस धरले, तरी उत्पादन व आवक यापेक्षा वितरण अधिक होत आहे. केमिकल वापरून तयार केलेल्या लाखो लिटर बोगस दुधाची भर पडल्यानेच उत्पादनापेक्षा वितरण अधिक होताना दिसते आहे.

पाणी, पावडर, स्टार्च, साखर, ग्लुकोज, युरिया, अमोनियम, मीठ, न्युट्रीलायजर, हायड्रोजन पेरॉक्‍साईड, डीटर्जंट पावडर यासारख्या पदार्थांचा वापर करून लाखो लिटर भेसळीचे दुध राज्यात तयार होत आहे. कारवाईमध्ये पकडण्यात आलेल्या दुधाच्या तपासणीमुळे या म्हणण्याला वारंवार दुजोरा मिळाला आहे. दुध महापुराचे इंगित भेसळीच्या या लाखो लिटर दुधात दडलेले आहे. दुध उत्पादकांना यामुळेच त्यांच्या दुधाला अत्यल्प भाव मिळतो आहे.

ग्राहकांनाही या भेसळीमुळे निकृष्ट व आरोग्यास अत्यंत घातक दूध विकत घ्यावे लागत आहे. दुधातील ही भेसळ रोखण्यासाठी भेसळ शोधणाऱ्या मिल्क स्ट्रीप’ चा वापर मोठ्या प्रमाणात वाढविणे आवश्‍यक आहे. दुधाचे उत्पादन, आवक व वितरण याचा अचूक ताळमेळ लावणारी यंत्रणाही निर्माण करणे आवश्‍यक आहे, अशी भावना त्यात त्यांनी मांडली आहे.
अन्न व औषधी प्रशासन आणि नगरपालिकांकडे भेसळ शोधण्याची मुख्य जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र प्रशिक्षित मन्युष्यबळ उपलब्ध नसल्याने भेसळ विरोधी पथके नसल्यात जमा आहेत.

परिणामी भेसळीचा महापूर सुरु आहे. शेतकरी व ग्राहकांच्या आरोग्याशी सुरु असणारा हा जीवघेणा खेळ थांबविण्यासाठी सरकारने आता तरी गंभीर होत, भेसळी विरोधात कठोर पावले उचलावीत अशी मागणी डॉ. अशोक ढवळे, धनंजय धोरडे, अनिल देठे, संतोष वाडेकर, उमेश देशमुख, कारभारी गवळी, गुलाबराव डेरे, डॉ. संदीप कडलग, रोहिदास धुमाळ, महेश नवले, विठ्ठल पवार, अमोल वाघमारे, माणिक अवघडे, सुभाष निकम, खंडू वाकचौरे, अशोक सब्बन, गोविंद आर्दड, राजाभाऊ देशमुख, विलास बाबर आदी उत्पादक व संघर्ष समितीने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)