अकोला : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यातच आता अकोला जिल्ह्यातील कोरोना बाधितांची माहिती समोर येत आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ही ९ वर पोहचली आहे. तर या ९ पैकी ७ रुग्ण हे एकट्या पातूर गावातील असल्याने इथे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज सकाळी प्राप्त अहवालानुसार पातूर येथील सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
हे सर्वजण वाशीम येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले होते. आता अकोला जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नऊ झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. दरम्यान, अकोला जिल्ह्यात एकूण १४८ नमुने तपासण्यात आले होते. त्यापैकी
१०९ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील ९ अहवाल पॉझिटिव्ह आणि १०० अहवाल निगेटिव्ह आले आहेत.