Goun Khanij Scam : जिल्ह्यातील प्रशासनात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे स्थानिक प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. (Goun Khanij Scam) मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील गौण खनिज खाणी सुरू ठेवण्यासाठी गायकवाड यांनी खाण मालकांकडून प्रत्येकी १५ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. तसेच पैसे न दिल्यास व्यवसाय बंद पाडण्याची धमकी दिल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात संबंधित खाण मालकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीसोबत ऑडिओ क्लिप्ससारखे पुरावेही सादर करण्यात आले. तक्रार दाखल झाल्यानंतर तब्बल ९ दिवसांनी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. (Goun Khanij Scam) Goun Khanij Scam : महाराष्ट्रात खळबळ..! ‘या’ जिल्हाधिकाऱ्यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल या प्रकरणात BNS कायद्यांतर्गत कलम 308(2), 351(1) तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, प्रमोद गायकवाड यांनी आपल्या विरोधातील सर्व आरोप फेटाळले असून हे आरोप निराधार असल्याचा दावा केला आहे. या घटनेमुळे अकोल्यात संताप व्यक्त होत असून संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करून निलंबनाची मागणी जोर धरत आहे. (Goun Khanij Scam)