नवी दिल्ली : दिल्लीत आज सकाळी आठ वाजल्यापासून विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत 44.78 टक्के मतदान झाले आहे.
दिल्ली के अभूतपूर्व कल्याण और विकास की निरंतरता की शुभकामनाएँ!#कामबोलताहै pic.twitter.com/uliqzkDxP8
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) February 8, 2020
दरम्यान, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अखिलेश यादव यांनी ट्वीट करून लिहिले की, ‘दिल्लीच्या अभूतपूर्व कल्याण आणि विकासासाठी शुभेच्छा. दिल्लीत केलेले काम बोलते असे ट्विट त्यांनी केले आहे.