पुणे(प्रतिनिधी) – ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी साद घालत बाप्पांना निरोप देण्यात आला. सायंकाळी 7 वाजता शारदा गणपतीचे विसर्जन होवून, मानाच्या आणि प्रमुख मंडळांच्या विसर्जन सोहळ्याची सांगता झाली.
फुलांच्या आकर्षक पायघड्या….मंत्रोच्चाराचे मंगमय सूर आणि गुलाबपुष्पाचा वर्षाव करीत भावपूर्ण वातावरणात अखिल मंडई मंडळाच्या गणरायाला निरोप देण्यात आला. पुष्पहारांनी सजविलेल्या आणि कलशाची प्रतिकृती असलेल्या भव्य गजकुंडात गणरायाला निरोप देण्यात आला. सायंकाळी ७ च्या सुमारास कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गणरायाचे विसर्जन झाले.