गाळे, प्रतिनिधींसाठी सशुल्क नोंदणी सुरू

 अखिल भारतीय साहित्य संमेलन; इच्छुकांनी संपर्क साधण्याचे मसापतर्फे आवाहन

 

पुणे – अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 26 ते 28 मार्च रोजी नाशिक येथे होत आहे.

या संमेलनात प्रकाशकांना व पुस्तकविक्रेत्यांसाठी गाळा तसेच साहित्यप्रेमींना निवासासाठी सशुल्क नोंदणी सुरू झाली असून, इच्छुकांनी परिषदेच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन मसापतर्फे करण्यात आले आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्यभरातून प्रकाशक, पुस्तकविक्रेते तसेच राज्यभरातून येणाऱ्या साहित्यिकांचा नेहमीच भरभरून प्रतिसाद मिळतो. नाशिक येथे होणाऱ्या संमेलनासाठी नोंदणीबाबत सातत्याने विचारणा होत आहे.

पुण्यातून संमेलनात सहभागी होणाऱ्या प्रकाशक, पुस्तकविक्रेते तसेच साहित्यिक यांच्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे सशुल्क नोंदणी सुरू केली आहे. परिषदेच्या कार्यालयात सकाळी 9 ते 12 या वेळेत नोंदणीचे अर्ज उपलब्ध आहेत.

ज्या गाळे धारकांना किंवा प्रतिनिधींना नोंदणी करायची असेल त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेत वरील वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.