Sanju Samson – भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून तेथे वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने बाजी मारली होतो, तर दुसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे सध्या यजमान संघ मालिकेत १-० अशा फरकाने आघाडीवर आहे. दरम्यान, भारतीय संघाचा फलंदाज संजू सॅमसन याला संघात सातत्याने का खेळवले जात नाही? असा सवाल चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत बोलताना माजी क्रिकेटपटू व सध्याचा समालोचक आकाश चोप्राने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
#VijayHazareTrophy | महाराष्ट्राचा ऋतुराज गरजला…! ‘अशी’ कामगिरी करणारा जगातील एकमेव खेळाडू
संजू सॅमसनला पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळवल्यानंतर त्याला दुसऱ्या सामन्यात एका अतिरिक्त गोलंदाजांचे कारण सांगून बाहेर बसवण्यात आले होते. यानंतर चाहत्यांकडून बीसीसीआय मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. चाहत्यांनी सॅमसन आणि ऋषभ पंत यांची एकमेकांशी तुलना करत संघ व्यवस्थापनाला धारेवर धरले. कारण मागील काही सामन्यांमध्ये पंत संधी मिळूनही चांगली कामगिरी करू शकला नाही. तर दुसरकडे सॅमसनला सातत्याने संघात संधी स्थान दिले जात नाही.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात संजू सॅमसनला संघात खेळण्याची संधी मिळाली होती. या सामन्यात त्याने ३८ चेंडूत ३६ धावा केल्या होत्या. महत्वाचं म्हणजे संघाला आवश्यकता असताना सॅमसनने श्रेयस अय्यरसोबत ९४ धावांची भागीदारी केली होती. असे असूनही, दुसऱ्या सामन्यासाठी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते. यानंतर अनेक माजी खेळाडूंनीही संघ निवडीवर प्रश्न उपस्थित केले होते.
आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवरील संभाषणादरम्यान म्हटले की, “कुलदीप यादवला राहिलेल्या एका सामन्यात खेळावा. तसेच उमरान मलिकला खात्रीशीर पद्धतीने खेळावा. त्याचप्रमाणे दीपक हुडालाही खेळावा, मात्र संजू सॅमसनला सातत्याने संघात खेळावायला हवे. जर तुम्ही संजू सॅमसनला बुधवारी होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात खेळवले नाही तर मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जाऊ लागू शकते. त्यामुळे सॅमसनला संघाबाहेर ठेवल्यास टीका तर नकीच होणार आहे.”