पुणे: कानपूर येथे रविवारपासून सुरू होत असलेल्या फाईव्ह-अ-साईड राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या पुरूष व महिला संघांचे नेतृत्व अनुक्रमे आकाश चिकटे व एच.रौतफेली यांच्याकडे देण्यात आले आहे. मिश्र गटासाठी महाराष्ट्राच्या कर्णधारपदी टायसन परेराची निवड झाली आहे.
हॉकी महाराष्ट्रतर्फे या संघांची निवड करण्यात आली. शिवछत्रपती क्रीडानगरीत ऑलिम्पिकपटू अजित लाक्रा, आंतरराष्ट्रीय खेळाडू एडगर मस्कॅरिन्हास व हेलेन मेरी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या खेळाडूंकरिता दहा दिवसांचे सराव शिबिरही घेण्यात आले होते. मिश्र गटात गेली दोन वर्षे महाराष्ट्राने विजेतेपद मिळविले होते व यंदा त्यांना हॅट्ट्रिकची संधी मिळणार आहे.
महाराष्ट्र संघ-पुरूष-आकाश चिकटे (कर्णधार), टायसन परेरा (उपकर्णधार), तलीब शाह, व्यंकटेश केंचे, अनिकेत गुरव, विक्रम यादव, प्रताप शिंदे, मुंडू उलसन, मोहम्मद अलीशाह. व्यवस्थापक-सागरसिंग ठाकूर, प्रशिक्षक- एडगर मस्कॅरिन्हास. महिला-एच.रौतफेली (कर्णधार), दिव्या ठेपे, आर. रामगेईगझुली, ऐश्वर्या चव्हाण, प्रीती दुबे, रुतुजा पिसाळ, वैष्णवी फाळके, पी. लाल्हुन्मेवेई, अक्षता ढेकळे. व्यवस्थापक-पूजा भोयार, प्रशिक्षक-हेलेन मेरी. मिश्र गट संघ-टायसन परेरा (कर्णधार), दिव्या ठेपे, विक्रम यादव, प्रताप शिंदे, प्रीती दुबे, रुतुजा पिसाळ, एच.रौतफेली, मोहम्मद अलीशाह, तलीब शाह. व्यवस्थापक-हेलेन मेरी. प्रशिक्षक-एडगर मस्कॅरिन्हास.