Delhi Airport Plane Accident: दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी दुपारी दोन विमानांमध्ये झालेल्या धडकेमुळे एकच खळबळ उडाली. पार्किंग परिसरात उभ्या असलेल्या अकासा एअरलाइनच्या विमानाला स्पाईसजेटच्या विमानाने धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही विमानांच्या पंखांचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी (१६ एप्रिल २०२६) दुपारी २ च्या सुमारास घडली. लेहहून आलेले स्पाईसजेटचे विमान लँडिंगनंतर गेटच्या दिशेने जात होते. याचवेळी हैदराबादला जाण्यासाठी सज्ज असलेले अकासा एअरचे विमान पार्किंग परिसरात उभे होते. स्पाईसजेटचे विमान वळण घेत असताना त्याचा उजवा पंख अकासा एअरच्या विमानाला जोरात धडकला. (Delhi Airport Plane Accident) दोन्ही विमानांचे नुकसान – Delhi Airport Plane Accident: दिल्ली विमानतळावर दोन विमानांची धडक; सुदैवाने मोठा अनर्थ टळला, सर्व प्रवासी सुरक्षित या धडकेत स्पाईसजेट आणि अकासा या दोन्ही विमानांच्या पंखांचे (Wings) गंभीर नुकसान झाले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने तात्काळ बचावकार्य सुरू केले. स्पाईसजेट विमानाचा उजवा पंख निकामी झाला असून, हे विमान तूर्तास सेवेतून बाहेर काढण्यात आले आहे. अकासा एअर (QP 1406) पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या या विमानाला धडक बसल्याने त्याचेही नुकसान झाले आहे. (Delhi Airport Plane Accident) हेही वाचा – महाराष्ट्र पुन्हा हादरला! आणखी एका भोंदू बाबाचे धक्कादायक कारनामे उघड, पोलिसांनी केली अटक प्रवाशांची सुरक्षित सुटका आणि पर्यायी व्यवस्था – अकासा एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स पूर्णपणे सुरक्षित आहेत. “प्राथमिक माहितीनुसार, आमचे विमान पार्किंगमध्ये उभे असताना दुसऱ्या विमानाने त्याला धडक दिली. प्रवाशांच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य असून, त्यांना लवकरात लवकर हैदराबादला पोहोचवण्यासाठी ग्राउंड टीम पर्यायी विमानाची व्यवस्था करत आहे,” असे कंपनीकडून सांगण्यात आले. तपासाचे आदेश – फ्लाइटरडार२४ च्या आकडेवारीनुसार, ही घटना विमानांच्या हालचालीदरम्यान घडली आहे. विमानतळ प्राधिकरणाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून, नेमकी चूक कोणाची होती आणि तांत्रिक बिघाड होता का, याचा तपास केला जात आहे. या घटनेमुळे दिल्ली विमानतळावरील काही काळ विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला होता.