रा. स्व. संघावर बंदीची अकाल तख्तची मागणी

अमृतसर : अकाल तख्तचे प्रमुख जथ्थेदार ग्यानी हरप्रितसिंग यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी केली. संघाचे हिंदु राष्ट्र बनवण्याचे ध्येय देशहिताचे नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

संघावर बंदी घातलीच पाहिजे. संघ जे करत आहे, त्यातून देशाचे विभाजन होईल. संघाच्या नेत्यांची वक्तव्ये देशाच्या हिताची नाहीत, असे ते म्हणाले. हरप्रितसिंग पत्रकारांशी बोलत होते. शिख धर्मीयांच्या सर्वोच्च धार्मिक संस्थेच्या प्रमुखाने हे विधान केल्याने त्यास महत्व आले आहे.

भारतात हिंदु, मुस्लीम, शिख, ख्रिस्ती, बुध्द, पारशी आणि ज्यू धर्मीय राहतात.त्यामुळे या देशाला हिंदु राष्ट्र बनवणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले. सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघ स्थापना दिनाच्या शुभेच्छा देताना या देशाला हिंदूराष्ट्र असे संबोधले होते. तसेच झूंडबळीची परंपरा बाहेरून आलेल्या धर्मांची असल्याचे विधान केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.