अनेक तक्रारींवर रामबाण ओवा

चवीला तिखट, कडवट, आंबट असा असतो ओवा… ओव्याला इंग्लिश मध्ये कॅरॅम सीड्‌स म्हणतात. प्राचीन काळापासून ओवा आरोग्य समस्यांवर वापर केला जातो. अनेक पदार्थामध्ये ओवा आवर्जून वापरला जातो. पदार्थ रुचकर बनवण्यासाठी ओव्याचा उपयोग केला जातो.

भजी, वडे, वड्या अश्‍या अनेक पदार्थामध्ये पचनासाठी ओवा वापरला जातो. ओव्यामध्ये कार्बोहैड्रेट, प्रोटीन, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, पोटॅशियम, सोडियम असतात.
1.वजन कमी करण्यासाठी ओवा उपयुक्त ठरतो. ओवा कोमट  पाण्यात टाकून पाणी प्यायल्याने शरीराची पचन क्षमता वाढते.
2.गुडघे दुखत असल्यास गरम ओवा  करावा आणि तो एका रुमालात बांधून गुडघ्यांना शेक घ्यावा. गूडघ्यांना आराम मिळतो.
3.महिलांना मासिक पाळीच्या वेळी कंबरदुखी, पोटदुखीचा त्रास होतो. ओवा तापवलेल्या पाण्याबरोबर घेतल्यास त्रास कमी होतो.
4.पूर्वीच्या काळी बाळंतिणीला आणि बाळाला ओवा ची धुरी देण्याची पध्दत होती. ओव्याने बाळाला सर्दी, खोकला होत नाही.
5.सर्दी झाल्यावर नाक मोकळे किंवा श्वास घेण्यास त्रास झाल्यास  ओव्या ची धुरी घेणे फायदेशीर ठरते.

6.ओवा पचनक्रिया सुधारण्यास उपयोगी ठरतो. ओव्यात पाचक गुणधर्म असतात.
7.अपचन, पोटात गॅस झाल्यास ओवा खावा. ओवा ने पोटातील गॅस कमी होण्यास मदत होते.
8. दातदुखी, हिरडया सुजणे, दातातील इन्फेकशन होत असल्यास ओवा  पाण्याच्या गुळण्या केल्यास आराम मिळतो.
9. मुळव्याधीचा त्रास होत असेल तर आराम मिळण्यासाठी ओवा फायदेशीर ठरते.
10.मायग्रेनवर ओवा गरम करून त्याचा वास घेतल्याने आराम मिळू शकतो.
11.ओवा मुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. मधूमेहींना ओवा खाणे चांगले फायदेशीर ठरते.
12. ओवा हा किडनी स्टोन चा त्रासावर खावे.
13.ओवा हा बॅड कोलेस्ट्रॉल आणि ट्राईग्लिसराइडची पातळी कमी करण्यात व गूड कोलोस्ट्रॉलची पातळी वाढवण्यास मदत करते.
डॉ. आदिती पानसंबळ
आहारतज्ञ 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.