‘अजमल कसाबचा मोबाईल परमवीरनी लपवला होता’, माजी पोलीस अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंह यांनी एटीएसमध्ये असताना मुंबईवर हल्ला करणारा दहशतवादी अजमल कसाब याचा मोबाईल लपवून ठेवला होता, असा खळबळजनक आरोप माजी सहाय्यक पोलीस आयुक्त शमशेर पठाण यांनी केल्याने खलबळ उडाली आहे.

दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी हे केले असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.
शमशेर पठाण यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले असून सखोल चौकशीची मागणी केली आहे. या पत्रात परमबीर सिंह यांनी 26/11 दहशतवादी हल्ल्‌यातील दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल लपवला होता किंवा कुणाला तरी दिला होता, असे म्हटले आहे.

परमबीर सिंह यांनी महाराष्ट्र एटीएसमध्ये कार्यरत असताना अजमल कसाबचा मोबाईल चौकशीसाठी घेतला होता. या प्रकरणाची चौकशी मुंबई क्राइम ब्रॅंचकडे देण्यात आली .मात्र, परमबीर सिंह यांनी तो मोबाईल क्राइम ब्रॅंचकडे दिला नव्हता, असा दावा पठाण यांनी केला आहे.

मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा याच मोबाईलवरुन कसाबसह इतर दहशतवादी पाकिस्तानमधील हॅंडलरशी संवाद साधत होता. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी पठाण यांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.