मुंबई – भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करताना, ‘पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत’ असं वक्तव्य केलं होत.
पडळकरांच्या या टीकेनंतर त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.अशातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांनी पडळकरांच्या टीकेला जोरदार प्रतिउत्तर दिल आहे.
गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी, “शरद पवार यांना उभा भारत देश ओळखतो. कुठलंही संकट येवो, गारपीट, दुष्काळ, भूकंप किंवा इतर काही समस्या. शरद पवार उमेदीच्या काळात तर फिरलेच मात्र या वयातही ते पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. ज्या माणसाची योग्यता नाही, आपण काय बोलतो, कुणाबद्दल बोलतो याचा जराही विचार जो माणूस करत नाही त्याच्याबद्दल काय बोलायचं? सूर्याकडे पाहून थुंकल तर थुंकी आपल्याच अंगावर पडणार ना?” अशी जोरदार टीका केली.
विधानसभेच्या निवडणुकीची आठवण
यावेळी बोलताना अजित पवार यांनी पडळकरांना विधानसभेच्या निवडणुकीची आठवण करून देत, ‘बारामतीकरांनी सर्वांची डिपॉझिट जप्त केली तसं यांचंही डिपॉझिट जप्त केलं. यावरुन त्यांच्यामागे किती जनाधार आहे ते समजतं, राज्याने ते ओळखलं आहे.’
But i support mr. Padalkar coz something is true in padalkars statement. Nit all statement is false. Then how pawar saheb make all sugar factories and so many schools and colleges.