मुंबई – राम मंदिरासंदर्भात ‘सामना’त केलेल्या टीकेवर काल भाजपने शिवसेना भवनासमोर निषेध आंदोलन केले. त्यावेळी शिवसेनेचे कार्यकर्तेही तिथे जमले आणि दोन्ही गटात तुफान राडा झाला. यावर प्रतिक्रिया विचारली असताना संजय राऊत यांनी शिवसेना भवनाकडे वाकडी नजर टाकणाऱ्यांना प्रसाद मिळतच राहणार असल्याचे म्हटले.
तसेच शिवसेना ही सर्टिफाईड गुंडा पार्टी आहे, मराठी माणसाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना आम्ही गुंडगिरी दाखवू असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले होते. यावर आज माध्यमांनी बोलतांना अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,’कुठल्याही पक्ष स्वतः गुंड म्हणून घेणार नाही. राज्यात शिवसेना हा पक्ष प्रमुख असून कायद्याने राज्य चालवणं, नियमाने काम चालवणं, सगळ्यांना सोबत घेऊन काम करणं असं काम मुख्यमंत्री करत आहेत” असं म्हणत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.