पुण्यावर अजित पवारांचे योग्य लक्ष; बागुल यांनी आघाडीत बिघाडी करू नये

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर आणि जिल्ह्याचे करोना नियंत्रणाचे काम वेगाने सुरू आहे सुरू आहे. उपमुख्यमंत्री त्यासाठी दररोज शहराचा आढावा घेत असून महाविकास आघाडीचे घटक म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच पालकमंत्री पवार यांच्याकडे ही जबाबदारी दिली आहे. असे असतानाही महाविकास आघाडीचा घटक असलेले महापालिकेतील कॉग्रेसचे गटनेते आबा बागुल पुण्यात स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वैयक्तिक लक्ष घालण्याची मागणी करून महाविकास आघाडीत बिघाडी करण्याचे काम करत असल्याची टीका विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांनी केली आहे.

  उपमुख्यमंत्री पवार हे रोज शहराचा आढावा घेत असून पालिका प्रशासन , जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी आवाश्यक त्या सूचना देत आहेत. राज्यशासनाच्या माध्यमातुन आवश्यक असलेला निधी, औषध, उपचार साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. जे

करताना कोणतेही राजकारण न करता सर्व पक्षांना सोबत घेऊन हे काम सूरु असताना कॉग्रेस गटनेते बागुल यांनी अशी मागणी करून महाविकास आघाडीत दुही पसरवत असून असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा धुमाळ यांनी दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.