Ajit Pawar | महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान दिले नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. यातच रविवारी अजित पवार नाशिक जिल्हा दौऱ्यावर होते. या दौऱ्यानिमित्त छगन भुजबळ आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर येणार होते. यासाठी नाशिकमध्ये जोरदार तयारी करण्यात आली होती. मात्र अजित पवार यांचा नाशिक दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे.
हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अजित पवारांचा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार आणि छगन भुजबळ पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार असल्याने या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली होती. पण अजित पवारांचा दौरा रद्द झाला आहे. Ajit Pawar |
दरम्यान, छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात सन्मानाने स्थान मिळावे, यासाठी भुजबळ समर्थकांकडून राष्ट्रवादी कार्यालयासमोर बॅनर लावण्यात आले आहे. तसेच भुजबळ यांनी वारंवार वक्तव्य करुनही अजित पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे आजच्या राष्ट्रवादी कार्यालयात होणाऱ्या मेळाव्यात अजित पवार काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र अचानक अजित पवार यांचा दौरा रद्द झाल्याने भुजबळ समर्थकांचा हिरमोड झाला आहे. Ajit Pawar |
हेही वाचा:
Devendra Fadnavis : नाशिकमध्ये जाणीवपूर्वक दंगल घडवली; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं