बारामती : बारामती विधानसभा मतदार संघामधून राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप,शिवसेना मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार म्हणून अजित पवार हे सोमवार दि( २८) ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
या दिवशी सकाळी 10 वाजता शहरातील कसबा येथून मिरवणूक सुरू होणार आहे .दुपारी 1 वाजता ते निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करतील. नंतर प्रचाराचा शुभारंभ श्री क्षेत्र कन्हेरी येथे दुपारी 2 वाजता करणार आहे. पक्ष निरीक्षक सुरेश पालवे,तालुका अध्यक्ष राजवर्धन शिंदे,निवडणूक प्रतिनिधी किरण गुजर यांनी ही माहिती दिली आहे.
‘या’ दिवशी पार पडणार निवडणूक
सध्या राज्यात आचारसंहिता लागली असून 20 नोव्हेंबर रोजी राज्यात निवडणूक पार पडणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.