Saif Ali Khan | Ajit Pawar : अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या राहत्या घरी चाकूने हल्ला झाला. आरोपीने अभिनेत्यावर सहा वेळा हल्ला केला होता. तेव्हापासून सैफ मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल आहे. त्याच्यावर मागील पाच दिवसांपासून लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सैफ अली खानची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूर आणि मुलगी सारा अली खान त्याला रुग्णालयातून घरी आणण्यासाठी आल्या होत्या. सैफ सहा दिवसांनंतर त्याच्या घरी परतला आहे. डॉक्टरांनी अभिनेत्याला फक्त विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान, अश्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आज जालन्यामध्ये पत्रकारांनी अजित पवार यांना ‘सैफ अली खानवर काल रात्री उशिरा हल्ला झाला आहे, त्यावर तुमचं काय मत आहे?’ असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ‘मला काय झालंय, कसं झालंय, कुठं हल्ला झाला काहीच माहिती नाही, आणि दुसरीकडे विरोधक मुंबईची कायदा व्यवस्था ढासळली म्हणायला लागले, असं म्हणत अजित पवारांनी टोला लगावला आहे.
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले, ‘आता सैफ अली खानच्या घरातील घटनेची माहिती समोर आली आहे. तो चोर कसा वरती घरात गेला, त्याला चोरी करताना माहिती नव्हतं, ते सैफ अली खानचं घर आहे, श्रीमंत लोक इथे राहतात असं त्याला माहिती होतं. त्याला बांगलादेशला परत जाण्यासाठी पन्नास हजार रूपये परत होते, म्हणून त्यांनी तिथे चोरी करायला गेला, या घटनेनंतर तर विरोधक आमच्यावर टीका करत होतेच, पण कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून आम्हाला बोलतात. मी म्हणतो थोडी कळ काढा. थोडा धीर धरा, सगळं काही समोर येत, असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले.