जलसंपदामंत्री छगन भुजबळ यांनी दिले पवार यांना अधिकार
पुणे – शहरातील पाणीसाठ्याबाबत शनिवारी अनेक निर्णय घेतले जाणार असून, खुद्द अजित पवारच कालवा समितीची बैठक घेणार आहेत. जलसंपदामंत्री छगन भुजबळ यांनी पवार यांना बैठक घेण्याचे अधिकार दिले आहेत.
धरणांमधून शेतीसाठी कालव्यामध्ये सोडण्यात येणारी आवर्तने आणि पुणे, पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीसाठा यासह विविध बाबींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. जलसंपदा मंत्री छगन भुजबळ यांनीही जिल्ह्यातील कालवा समिती बैठक घेण्याचे अधिकार पवार यांना दिल्याचे पत्र पाटबंधारे खात्याला प्राप्त झाले. याला सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.