Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात आकस्मिक निधन झाले आहे. या धक्कादायक बातमीने संपूर्ण देशावर शोककळा पसरली असून राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केली. या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांना येत्या २८ ते ३० जानेवारीदरम्यान सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या दोघांनीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून बारामती येथील विमान अपघाताबाबत माहिती घेतली. दुसरीकडे, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार विमान धावपट्टीवर उतरत असतानाच ही दुर्घटना घडली. विमान कोसळताच त्याने पेट घेतल्याने ते संपूर्ण जळून खाक झाले. देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? प्रधानमंत्री, गृहमंत्री सर्वांशी चर्चा करून त्यांनाही घडलेल्या परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली आहे. त्यांनीही याबद्दल प्रचंड दुःख हे व्यक्त केलेलं आहे, एकूणच देशातच या संपूर्ण प्रकरणामुळे हळहळ पसरलेली आहे. पुढच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या परिवाराशी चर्चा करून ठरवण्यात येतील. सकाळी सुप्रियाताईंची माझं बोलणं झालं. त्यानंतर पार्थ पवारांशी माझं बोलणं झालं. एकदा संपूर्ण परिवार बारामतीला पोहचल्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टींचे निर्णय हे त्यांच्या संमतीने घेतले जातील. महाराष्ट्रामध्ये आज शासकीय सुट्टी आम्ही घोषित केलेली आहे, तीन दिवसाचा दुखवटा देखील जाहीर करण्यात आलेला आहे, पुढच्या सर्व बाबींची कल्पना लवकरच देण्यात येईल, पण मला असं वाटतं की कधीकधी भरून न निघणारं अशा प्रकारचं नुकसान आहे. महाराष्ट्रातून असे लोकनेते गेल्यावर जी पोकळी निर्माण होते ती भरून काढणं अतिशय कठीण आहे, आणि निश्चितच इतक्या जवळून आणि इतक्या संघर्षाच्या काळात एकत्रित काम केलेला आहे, त्यातनं अशा गोष्टीवर विश्वास ठेवायला मन तयार होत नाही, अशी भावना देखील देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली आहे. हे देखील वाचा… Ajit Pawar : ‘अजित पवारांच्या अपघाताची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी’,ममता बॅनर्जी यांची मागणी Ajit Pawar : दोष असतांनाही त्याच विमानाचा वापर? तपासात समोर आलेले खुलासे हादरवणारे