#AirStrike :अजित पवारांकडून राज्याच्या विधीमंडळात अभिनंदन प्रस्तावाला पाठिंबा

मुंबई – भारताने वायूसेनेच्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात जवळपास 200 ते 300 दहशतवादीही ठार झाल्याची माहिती आहे. भारतीय वायूसेनेनं केलेल्या या कामगिरीबाबत राज्याच्या विधीमंडळात अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाला विरोधी पक्षाकडून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पांठिबा दिला आहे.

भारतीय हवाई दलानं पाकव्याप्त काश्मीरात दहशतवादी संघटनांच्या तळांवर केलेल्या कारवाईबद्दल भारतीय वायूसेनेचं अभिनंदन ! जेव्हा आमच्याकडे कुणी वाकड्या नजरेनं पाहतं, तेव्हा सव्वाशे कोटी देशवासी एकत्र येऊन चोख उत्तर देतात, असा संदेश आपण जगाला दिला आहे. जवानांच्या शौर्याला सलाम! असं म्हणत अजित पवारांनी अभिनंदन प्रस्तवाला पाठिंबा दिला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×