Ajit Pawar on Supriya Sule । विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या २९ ऑक्टोबर रोजी शेवटचा दिवस असल्यामुळे आज राज्यातील अनेक दिग्गज नेते आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील बारामतीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अजित पवार यांनी बारामतीत मोठं शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. या जागेवर त्यांची स्पर्धा त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्याशी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार) युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे.
युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास यांचे पुत्र आहेत. युगेंद्र यांची ही पहिलीच निवडणूक आहे. पुतण्यासोबतच्या लढतीबाबत अजित पवार म्हणाले की, बारामतीतून आम्ही चांगल्या मतांनी विजयी होऊ. प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. तसेच लोकसभेत आम्ही जी चूक केली ती चूक त्यांनी करायला नको होती” असे म्हणत त्यांनी सुनेत्रा पवार यांचा निर्णय चुकला असल्याचे कबुल केले.
बारामतीची जनताच सर्व ठरवेल Ajit Pawar on Supriya Sule ।
पुढे बोलताना त्यांनी ते म्हणाले, “मी माझ्या पत्नीला (सुनेत्रा पवार) सुप्रिया सुळे (बहीण) यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत उतरवले होते, ही आमची चूक होती. त्याने नुकतीच तीच चूक केली आहे. बारामती जनता ठरवेल. असे त्यांनी म्हटले. तसेच “लोकशाहीत निवडणुकीमध्ये सर्वांना उभं राहण्याचा अधिकार आहे. माझ्या विरोधात जेव्हा-जेव्हा जे उमेदवार उभे राहिले, ते सर्वच उमेदवार स्ट्रॉंग आहेत असं समजूनच माझ्या कार्यकर्त्यांनी, मी आणि माझ्या कुटुंबाने नेहमीच प्रचार केला. आता या निवडणुकीत देखील बारामतीकर चांगल्या मताधिक्यांनी मला निवडून देतील असा मला विश्वास आहे”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
ती माझी चूक, पण तीच चूक पुन्हा त्यांनी करायला नको होती Ajit Pawar on Supriya Sule ।
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, “त्यांनी युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली. तो त्यांचा अधिकार आहे. मी त्याबाबत जास्त काही बोलणार नाही. मात्र, त्यांनी (शरद पवार) असं करायला नको होतं. लोकसभेच्या निवडणुकीत मी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली, ती माझी चूक होती. पण तीच चूक पुन्हा त्यांनी (शरद पवार यांनी) करायला नको होती, पण चूक केली आहे. आता मतदार यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतील”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
सुप्रिया यांनी आपल्या मेहुणीचा १.५८ लाखांहून अधिक मतांनी पराभव केला आणि बारामतीची जागा राखली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) स्थापना शरद पवार यांनी 1999 मध्ये केली होती. जुलै 2023 मध्ये, त्यांचे पुतणे अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केले आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारमध्ये सामील झाले.
काय म्हणाले युगेंद्र पवार?
काकांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवल्याबद्दल युगेंद्र पवार यांनी नुकतेच सांगितले की, युगेंद्र पवार म्हणाले की, काका अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवणे हे त्यांच्यासाठी आव्हान आहे पण जनतेच्या प्रार्थना आणि आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असल्याने त्यांना काळजी नाही.
ते म्हणाले की, “माझे काका (अजित पवार) बारामतीतून निवडणूक लढले होते तेव्हा पवार साहेबांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होते… पण आता त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. पवार साहेबांचा अनुभव जास्त आहे, त्यामुळे मला प्रोत्साहन मिळाले आहे आणि माझे मनोबल वाढले आहे.” असे म्हणत त्यांनी शड्डू ठोकला.