अजितदादा इन स्टाइल…. म्हणाले, ‘पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतयं, अन्‌…’

पुणे – निवडणुकीमध्ये ज्याला डिपॉझिट वाचवता आलेलं नाही, त्याची काय एवढी नोंद घेता? उभा राहिल्यानंतर जनतेचा पाठिंबा आहे का? प्रमुख पक्षाचं तिकीट घेऊन पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतंय आणि त्याला काय महत्त्वं देतायं, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता टीका केली.

 

 

जेजुरी येथे पडळकर यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण केले. मात्र, हा कार्यक्रम शनिवारी (दि.13) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.

 

मात्र, त्यापूर्वीच पडळकरांनी हे अनावरण उरकून घेतले. यावेळी पडळकर यांनी पवार यांच्यावर टीका केली. पडळकर यांनी केलेली टीका म्हणजे “विनाशकाले विपरीत बुद्धी’ असेही पवार म्हणाले.

 

 

विमानप्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयानं बाजू मांडली

राज्यपालांना विमान नाकारल्याच्या विषयावर पवार म्हणाले, “याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने आपली बाजू स्पष्ट केली आहे. विमान वापरण्यास परवानगी नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने आधीच कळवले होते. विमान वापरण्यास परवानगी देताना काही तांत्रिक बाजू पाहव्या लागतात. इंजिन तंदुरुस्तीसह अनेक बाबींची शहानिशा करावी लागते.’

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.