मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाने मोठे वळण घेतले आहे. राष्ट्रवादीतील अजित पवार गटाच्या मदतीने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अजित पवारांवर पक्षाने तडकाफडकी कारवाई केली असून त्यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
Mumbai: Slogans raised in support of Sharad Pawar and against Ajit Pawar by a group of NCP workers outside YB Chavan Centre where Congress-NCP-Shiv Sena will address the media shortly. #Maharashtra pic.twitter.com/d8SdQhWVPO
— ANI (@ANI) November 23, 2019
अजित पवार यांच्याविरोधात मुंबईसह राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रोष व्यक्त करताना दिसत आहे. मुंबईत कार्यकर्ते आक्रमक झाली आहेत. भावुक झाले आहेत. कार्यकर्त्यांकडून ‘शरद पवार जिंदाबाद… अजित पवार मर्दाबाद’च्या घोषणा दिल्या जात आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याच्या अजित पवारांच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडली हे तर निश्चितच होते. मात्र आता पक्षासोबत पवार कुटुंबातही फूट पडल्यांचे स्वत: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ‘पक्ष आणि कुटुंब फुटलं’ असं स्टेट्स व्हॉट्सऍपवर सुप्रिया सुळे यांनी ठेवले आहे.