‘अजित पवार मोठा नेता नाही शरद पवारांमुळे राजकारणात संधी मिळाली मात्र..’

मुंबई – भाजपा नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामधील वादाचे पडसाद मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये उमटताना दिसत आहेत.

यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतपाटील यांनी  सोमय्या प्रकरणामध्ये चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर टीका केली होती. देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत. ते शंभर अजित पवार खिशात घेऊन फिरतात अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यावर आता भाजप नेते निलेश राणे यांनीदेखील अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. 

काय म्हणाले निलेश राणे 

‘अजित पवार मोठा नेता नाही. त्यांचे राजकीय करिअर पवार साहेबांमुळे सुरु झालंत्यांना राजकारणात जी संधी मिळाली ती फक्त पवार साहेबांमुळे पण त्यांनी घाण केली, त्यांच्या मंत्रिपदाचा महाराष्ट्राला काडीचा फायदा झाला नाही.’

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.