Dhangar Reservation – आरक्षणाच्या विषयावर आदिवासी समाज एकवटताना दिसत आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाचे नेते तथा आमदार नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत आदिवासी नेत्यांची आज (२३ सप्टेंबर) एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांनी सरकारवरच हल्लाबोल करत आक्रमक पवित्र घेतला.
नरहरी झिरवाळ म्हणाले, धनगर समाजाला आम्ही विरोध करत नाही. आम्हाला असे वाटते की त्यांना वेगळे आरक्षण द्यायला हवे. त्यांना साडेतीन टक्के आरक्षण आहे. त्यांचा आदिवासींमध्ये समावेश केला जाऊ नये असे आम्हाला वाटते. आम्ही याबाबत सरकारकडे विनंती केली आहे.
सरकार मात्र त्यासाठी बैठका घेत आहे. सरकार समाजा-समाजांमध्ये तेढ निर्माण करत आहे. त्यामुळे राज्यातील आदिवासींच्या वरिष्ठ नेत्यांना एकत्र बोलावण्याचा उद्देश बोलावले आहे. सरकार त्यांना सहकार्य करत आहे. त्यांना अजून आरक्षण दिलेले नाही.
परंतु, सरकार त्या आरक्षणाला अनुकूल असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र सरकारने आमचेही ऐकून घ्यावे. सरकारपुढे आम्ही काय मुद्दे मांडायचे, याबाबतच्या चर्चेसाठी आम्ही आज एकत्र चर्चा केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.