Ajit Pawar Group । राज्यात महायुतीचे सरकार आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांनी मिळून महायुतीचे सरकार स्थापन झाले. दरम्यान लोकसभा निवडणूक लागल्यानंतर आता या महायुतीत नाराजी नाट्य सुरु झाल्याचे दिसून येतंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला एक गट अजित पवार यांच्यावर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.
काही लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तगडे उमेदवार असतानाही राष्ट्रवादी महायुतीसाठी जागा सोडल्या, यामुळे पक्षातील एक गट अजित पवारांवर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. महायुतीत भाजपच्या दबाबमुळे राष्ट्रवादी पक्षातील एक गट नाराज असल्याचे बोलले जात आहे.
भाजपच्या दबावामुळे राष्ट्रवादीत नाराजी Ajit Pawar Group ।
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे नाशिकसह परभणी, गडचिरोली, सातारा या लोकसभा मतदारसंघात सक्षम उमेदवार असताना देखील भाजपच्या दबावाला बळी पडून निवडून येणाऱ्या जागा हातातून गेल्या आहेत. त्यामुळे नाराजीचा सूर या कार्यकर्त्यांमध्ये उमटत असल्याचे म्हटले जात आहे.
एक गट अजित पवारांवर नाराज Ajit Pawar Group ।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केवळ स्वत:च्या पक्षातील दोन उमेदवार आणि इतर ठिकाणी उमेदवार आयात केल्याने आणि निवडून येणारे मतदार संघ सोडून इतर मतदारसंघ घेतल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटातील एका गटाचं नाराजीचं वातावरण असल्याची सूत्रांची माहिती आहे.
नाशिक लोकसभेमुळे नाराजीत आणखी भर
नाशिक लोकसभेचा निर्णय तीन आठवडे घ्यायला विलंब लावल्याने या नाराजीत आणखी भर पडल्याची माहिती आहे. केंद्रीय पातळीवरून उमेदवारी जाहीर होऊन देखील राज्यातील नेत्यांच्या दबावाला झूगारता न आल्यामुळे नाशिकची निवडून येऊ शकेल, अशी जागा गमावल्याची भावना या नेत्यांमध्ये असल्याची सूत्रांची माहिती आहे.