Ajit Pawar । राज्यात लवकरच विधानसभा निवडणुक जाहीर होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून निडवणूकांसाठी रणनीती आखायला सुरुवात झाली. दोन्ही पक्षाकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यादरम्यान, मविआतील घटक पक्षातील नेत्यांनी माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत भाष्य केलं आहे. तर महायुतीला नेत्यांमध्येही यावरून चर्चा होत असल्याचे समजते आहे.
अशात मिळालेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान अजित पवार हे अनुपस्थितीत होते. त्यामुळे चर्चाना उधाण आले होते. त्यातच आता ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, अजित पवारांनी अमित शाह हे पुन्हा दिल्लीकडे होण्यासाठी रवाना होत असताना मुंबई विमानतळावर त्यांची भेट घेतली. यावेळी मुंबई विमानतळावर अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांनी त्यांच्या मनातील मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली. बिहार पॅटर्न राबवा, मला मुख्यमंत्रीपद द्या, असे अजित पवार म्हणाले.
दरम्यान, सत्ताधारी महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून कोणताही वाद नसून विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल,” असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी होते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबतच्या महाआघाडीचा भाग आहे. अमित शहा यांनी महाराष्ट्रात पुढचे सरकार महाआघाडीचेच स्थापन करणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा वाद नाही.असेही ते म्हणाले होते.
महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून दावे-प्रतिदावे
महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तृत्वाचा टप्पा सुरूच आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली होती पुढचा मुख्यमंत्री महाआघाडीचाच असेल, असे त्यांनी एका निवेदनात म्हटले होते. आगामी निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील.
दरम्यन, अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांच्या हस्ते पाच मजली केक कापण्यात आला. या केकवर ‘मी अजित आशा अनंतराव पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो’ असे लिहिले होते. केकवर लिहिलेल्या मेसेजने बरीच हेडलाईन मिळवली होती. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत दुसरी प्रतिक्रिया उमटली. ते म्हणाले की, पुढचा मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न कार्यकर्त्यांनी विचारला तर मी सांगतो पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच असेल. यानंतर मुख्यमंत्री कोण होणार विचारू नका.” असे म्हटले होते.