अजित पवार-देवेंद्र फडणवीस पुन्हा एकत्र; चर्चांना उधाण 

सातारा – विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तास्थापनेचे नाट्य चांगलेच रंगले होते. यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा एकत्र आले. करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या मुलाचे लग्न काल पार पडले. यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले असून जवळपास २० मिनिटे त्यांनी गप्पा मारल्या. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

याबाबत अजित पवार म्हणाले कि, शिंदे यांच्या मुलाच्या लग्नात त्यांची आणि माझी खुर्ची शेजारी-शेजारी होती. यावेळी आमच्यात हवा-पाण्याबद्दल गप्पा झाल्या, असे त्यांनी सांगितले. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचे व्हडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असताना अजित पवार यांनी भाजपासोबत जात सरकार स्थापन केले होते. मात्र, अवघ्या ८० तासांमध्ये कोसळले. यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येत महाविकासआघाडीचे सरकार स्थापन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.