Ajit Pawar : महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार (Ajit Pawar Dead) यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. या धक्कादायक बातमीने संपूर्ण देशावर शोककळा पसरली असून राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केली. या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांना येत्या २८ ते ३० जानेवारीदरम्यान सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन : दरम्यान, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीत दाखल झाले आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. तसेच खासदार सुप्रिया सुळे देखील होत्या. Ajit Pawar Family ही बातमी वाचा :Ajit Pawar : अजित पवारांचा विमानात बसलेला शेवटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल अजित पवार हे अत्यंत कर्मठ आणि वेळेचे काटेकोर पालन करणारे नेते म्हणून ओळखले जात. अनेक नेते किंवा सरकारी अधिकारी कार्यक्रमांना उशिरा पोहोचायचे, पण अजित पवार नेहमी वेळेतच कार्यक्रमठिकाणी हजर राहत. प्रशासनावर मजबुत पकड असलेल्या अजितदादांनी अधिकाऱ्यांच्या चांगल्या कामाची कौतुक केलेच, पण वेळप्रसंगी त्यांना फटकारले सुद्धा. काँग्रेस, शिवसेना आणि भाजपच्या नेतृत्वाखालील विविध सरकारांमध्ये उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. 1991 पासून बारामतीचा राजकीय किल्ला 22 जुलै 1959 रोजी आशा आणि अनंतराव पवार यांच्या पोटी जन्मलेल्या अजित पवारांनी 1982 मध्ये राजकारणात प्रवेश केला. 1991 मध्ये ते बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले आणि नंतर काका शरद पवार यांच्यासाठी ती जागा सोडली. त्यानंतर 1991 पासून सलग आठ वेळा ते बारामतीचे आमदार राहिले. अर्थ व नियोजन मंत्री म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 2026-17 चा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारीही त्यांच्यावर होती, मात्र त्यापूर्वीच त्यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. हे देखील वाचा : Ajit Pawar Death : विमानाचे अखेरचे क्षण…; अनेकदा उतरण्याचा प्रयत्न, गो-अराउंड, परवानगी, आणि मग अपघात