मुंबई : ठाकरे सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार 30 डिसेंबर रोजी होणार आहे. सुमारे 36 मंत्री शपथ घेऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्रिमंडळ विस्ताराविषयी सांगितले की, उद्या कॉंग्रेसचे 12 मंत्री शपथ घेतील. त्यातील 10 कॅबिनेट मंत्री असतील.
Maharashtra Minister and Congress leader Balasaheb Thorat: List has been finalized for the oath taking ceremony to be held tomorrow. The list will be out today. There will be 12 Ministers from Congress out of which 10 are of cabinet rank. https://t.co/iBc9t1GVZo pic.twitter.com/ifJpHYEe9I
— ANI (@ANI) December 29, 2019
सोमवारी उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची माहिती देताना मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, यादी निश्चित झाली आहे, उद्या शपथविधी होईल. अंतिम यादी आज जाहीर केली जाईल. कॉंग्रेसकडे 12 मंत्री असतील, त्यापैकी 10 मंत्री कॅबिनेट असतील . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सध्या सहा मंत्री आहेत. उद्या विधानभवनात शपथविधी सोहळा होणार आहे.
तीनही पक्षांमध्ये सत्ता वाटपाच्या सूत्रानुसार शिवसेनेकडे मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त 16 मंत्री असतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 14 तर कॉंग्रेसचे 12 मंत्री असतील. दरम्यान, उद्धव ठाकरे सरकारमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. यापूर्वी फडणवीस सरकारमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनीही शपथ घेतली होती.
नव्या मंत्रिमंडळात नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, आदिती तटकरे, सुनील देशमुख, दिलीप वळसे पाटील, दत्ता बारणे, राजेश टोपे अशी नावे राष्ट्रवादीकडून आघाडीवर आहेत. त्याचबरोबर, केसी पाडवी, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजयविजय वडेट्टीवार, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, सतेज पाटील यांची नावे कॉंग्रेसतर्फे आघाडीवर आहेत .