अजित पवार यांचे राष्ट्रवादीच्या आमदारांना निष्ठेचे मार्गदर्शन

झाले गेले गंगेला मिळाले आता पक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढवू : अजित पवार

मुंबई : शुक्रवारी रात्री भारतीय जनता पक्षासोबत हातमिळवणी करून सत्ता स्थापनेचा दावा करणारे राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीला उपस्थिती लावली. एवढेच नव्हे तर त्यांनी आमदारांना मार्गदर्शनही केले.

झाले गेले गंगेला मिळाले, झाले त्याचा विचार करू नका. आता पक्ष विस्तारण्यासाठी साऱ्यांनी एकजुटीने काम करायचे आहे. यापुढे आपल्याला शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील झेंड्याखाली एकत्र यायचे आहे, असे अजित पवार म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. काल जिथे अजित पवार यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या, तेथेच आज अजित पवार यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन घडवले. कार्यकर्त्यांनी एकच वादा अजितदादा, अजित पवार झिंदाबादच्या घोषणा गगनभेदी आवाजात दिल्या.

तत्पुर्वी, सर्व आमदारांनी आज विधानसभेत शपथ घेतली. त्यावेळी त्यांच्या स्वागताला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. त्यांना रोहित पवार यांनी खाली वाकून नमस्कार केला. त्याला सुप्रिया आत्यांनी जवळ घेत त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. त्यावेळी त्यानंतर तेथे आलेल्या अजित पवार यांनाही सुप्रिया सुळे यांनी जवळ घेतले. त्यावेळी या भावा बहिणीच्या चेहऱ्यावर नाते जपले गेल्याचा आनंद ओसांडलेला दिसत होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)