शेतकरीप्रश्नी केंद्र सरकारच्या भूमिकेवर अजित पवार संतापले; म्हणाले…

बारामती – राजधानी दिलेल्या वेशीवर गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. केंद्र सरकराच्या तीन कृषी कायद्यांविरुद्ध हे आंदोलन सुरू असून मोदी सरकार करत असलेल्या दिरंगाईवरून उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले आहे.

शेतकरी प्रश्नांबाबत केंद्र सरकारला स्वारस्य राहिलेले नाही. आठ-दहा वेळा झालेल्या सर्व चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. हा एकप्रकारे शेतकऱ्यांचा अपमान आहे.  शेतकऱ्यांबाबत केंद्र सरकारचे हे वर्तन दुर्दैवी आहे. त्यामुळे केंद्राचा निषेध करतो, अशा शब्दात अजित पवार यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. बारामती येथे अजित पवार माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये आम्ही देखील सहभागी होणार आहोत. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे आधीच स्पष्ट केले आहे. या आंदोलनाला महाविकास अघाडीमधील तिनही पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. आंदोलनात सहभाग नोंदवत असताना मुंबईमध्ये गर्दी करण्यापेक्षा प्रत्येकाने आपआपल्या तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन कारवीत, असंही ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.