अजित डोवाल यांची पुन्हा एकदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती

मोदी सरकारने दिला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा

नवी दिल्ली – सर्जिकल स्ट्राइक्सचे मास्टरमाइंड मानले जाणारे अजित डोवाल पुन्हा 5 वर्षांसाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्त झाले आहेत. तसेच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं राष्ट्राच्या सुरक्षेसाठी उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल अजित डोवाल यांना केंद्रीय मंत्रिपदाचा (कॅबिनेट) दर्जा देण्याचा निर्णयसुध्दा घेतला आहे.

दरम्यान, डोवाल यांनी मागील सरकारमध्येही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपद सांभाळलं आहे. 2014 मध्ये केंद्र सरकारनं त्यांची या पदावर नियुक्ती केली होती. 1968 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी डोभाल यांनी कित्येक वर्षे आयबी अर्थात इंटेलिजेन्स ब्युरोमध्ये काम केले आहे. ते आयबीचे प्रमुख देखील होते.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्‌यानंतर अवघ्या 12 दिवसांतच भारताने पाकला चोख प्रत्युत्तर दिले आहे. या एअर स्ट्राईकची भारतीय वायूदलाने अवघ्या 11 दिवसांत रणनीती रचून ती प्रत्यक्षात यशस्वी करून दाखविली. काश्मीरमध्ये केलेला सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकवेळी रणनिती आखण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.