बेरोजगारांसाठी आर्थिक भरारी अजिंक्‍य डेअरी

तरूणांच्या हाताला काम मिळावे, दूध संकलनात अधिकाधिक वाढ व्हावी, यासाठी गावोगावी दूध संकलन केंद्रे सुरू करण्याचा अजिंक्‍य डेअरी व्यवस्थापनाने आराखडा तयार केला आहे. त्याद्वारे समाजातील बेरोजगार, पार्टटाईम, व कमी पगारात रात्रंदिवस राबत असलेल्या तरूणांच्या हाताला काम मिळणार आहे. त्यामुळे नोकरीच्या मागे न लागता कमीत कमी भांडवलात स्वतःचा व्यवसाय क रण्याची सुवर्णसंधी तरूणांना उपलब्ध होणार आहे. तरूणांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, स्वावलंबी बनावे, सर्वाधिक महत्वाच्या कौटुंबिक आर्थिक अडचणी दूर कराव्यात या उदात्त हेतूनेच अजिंक्‍य डेअरी मार्फत गावोगावी दूध डेअरी संकलन केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. या सुवर्णसंधीचा अधिकाधिक तरूणांनी लाभ घ्यावा अशी डेअरी व्यवस्थापनाची योजना आहे.

घरकाम, शेती व इतर कामे सांभाळत आजपर्यंत अनेक तरूणांनी अजिंक्‍य डेअरीच्या या सुवर्णसंधीचा पुरेपूर लाभ उठवला आहे. त्यांना आर्थिक स्थिरता आली आहे. त्यांचे जीवनच बदलून गेले आहे. दूध संकलनातून पुरेसा पैसा मिळत असल्याने त्यांच्या अनेक अडीअडचणी दूर झाल्या आहेत. त्यासाठी इच्छूक तरूणांना आपापल्या गावातच अजिंक्‍य डेअरीचे दूध संकलन केंद्र सुरू करावे लागणार आहे. त्यासाठी आवश्‍यक ते सर्वतोपरी सहकार्य डेअरीमार्फत करण्यात येत असते. आवश्‍यक त्या साधनांची उपलब्धता डेअरीमार्फत करून देण्यात येते. त्यासाठी भांडवल सुरक्षितता म्हणून तरूणांकडून डाऊन पेमेंट म्हणून केवळ 15 हजार रूपये घेतले आहेत. त्यामध्ये परिस्थितीनुरूप सवलतही दिली जाते. दूध संकलन करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या सर्व तांत्रिक बाबींची माहिती, ज्ञान डेअरीमार्फत पूर्णतः मोफत दिले जाते. सकाळी साडेसात ते साडेनऊ असे केवळ दोन तास आणि संध्याकाळी सात ते आठ असा एक तासभर एवढाच वेळ दूध संकलनासाठी द्यावा लागणार आहे. हे काम एक व्यवसाय म्हणून करता येईल. त्याद्वारे उत्पन्न वाढणार आहे. ‘जादा काम जादा दाम’ या तत्वानुसार जेवढे अधिक दूध संकलन कराल, तेवढी तुमच्या उत्पन्नात भरघोस वाढ होणार आहे. त्यासाठी दूध संकलनाचे काम चिकाटीने करावे लागणार आहे, याची सतत जाणीव असायला हवी.

दूध संकलनाच्या माध्यमातून अनेक दूध उत्पादक, शेतकऱ्यांशी वारंवार संबंध येणार आहे. आपुलकीचे नाते तयार होणार आहे. त्यांना डेअरीमार्फत गोदरेज पशुखाद्याचा पुरवठा करण्यात येत असतो. आपले एकुण दूध संकलन व पशुखाद्य विक्रीची क्षमता लक्षात घेऊन पशुखाद्याची डिलरशीप आपणास देण्यात येते. त्यामुळे पशुखाद्य विक्रीच्या माध्यमातूनही तुमचे उत्पन्न वाढवण्यास मदत होणार आहे. त्यासाठी चिकाटीने, प्रामाणिकपणे व सचोटीने अधिकाधिक काम करण्याची आवश्‍यकता आहे. शेवटी तुम्ही जेवढी मेहनत घेणार आहात. तेवढाच फायदा तुम्हाला होणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्याचे धोरण अवलंबण्यात येणार असल्याने तुम्ही जर इच्छूक असाल, तर ताबडतोब अजिंक्‍य मिल्क प्रोसेसिंग लिमिटेडच्या (मायणी) प्लॅंटला भेट द्या, संपर्क साधा, हवी ती माहिती घ्या आणि तुमचा भविष्यकाळ उज्वल करणाऱ्या, आर्थिक उत्पन्न वाढवून अनेक समस्यांचा निपटारा करणाऱ्या या महत्त्वाकांक्षी योजनेत सहभागी व्हा.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.