“मैदान” चित्रपटातील अजयचा लुक आऊट

अजय देवगणचा बहुप्रतिक्षित “मैदान”चा नुकतेच टीझर पोस्टर रिलीज झाले होते. या पोस्टरमध्ये कोणाचाही चेहरा दिसत नाही.


केवळ चिखलामध्ये काही युवकांचे बरबटलेले पाय दिसत आहेत. हे युवक चिखलामध्ये फुटबॉल खेळत असल्याचे लगेचच ओळखायला येते. मात्र आज या चित्रपटातील अजय देवगणचा लुक आऊट झाला आहे.

या सिनेमात अजय देवगण व्यतिरिक्‍त प्रियामणी, गजराज राव आणि बोमन इराणीही असणार आहेत. अमित रवींद्रनाथ शर्मांनी या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे.

27 नोव्हेंबर 2020 रोजी “मैदान” रिलीज होणार आहे. प्रियामणिने यापूर्वी मनोज वाजपेयीबरोबर “द फॅमिली मॅन” या वेबसिरीजमध्ये मनोजच्या पत्नीचा रोल केला होता. पण हिंदी चित्रपटात हे तिचे पदार्पण असेल.

 

View this post on Instagram

 

?

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn) on


अजय देवगण हा अब्दुल रहिम नावाच्या फुटबॉल कोचचा रोल करत असणार आहे. सध्या अजयचा “तानाजी” फुल फॉर्मात सुरू आहे. त्याने कंगणा रणावतच्या “पंगा” ला धोबीपछाड दिली आहे. त्याच्या यशाचा आलेख अजूनही चढताच आहे. कबड्डी, क्रिकेट, बॉक्‍सिंग, कुस्तीवर सिनेमा येऊन गेला आहे. आता केवळ फुटबॉल शिल्लक राहिला होता. त्यात अजयने ही कसर भरून काढली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.