अजयकुमार भल्ला बनणार नवे केंद्रीय गृहसचिव

नवी दिल्ली: वरिष्ठ आयएएस अधिकारी अजयकुमार भल्ला यांची बुधवारी केंद्रीय गृह मंत्रालयात ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी (ओएसडी) म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते काही दिवसांनी केंद्रीय गृह सचिव बनतील. विद्यमान गृह सचिव राजीव गौबा 31 ऑगस्टला सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांची जागा भल्ला घेतील. ते भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) 1984 मधील तुकडीतील आसाम-मेघालय केडरचे अधिकारी आहेत. गृह सचिव म्हणून ते ऑगस्ट 2021 पर्यंत दोन वर्षांचा कार्यकाळ सांभाळतील. त्यांच्याकडे याआधी ऊर्जा सचिवपदाची जबाबदारी होती. ती जबाबदारी आता एस.सी.गर्ग यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. गर्ग यांच्याकडील आर्थिक कामकाज विभागाचे सचिवपद आता अतानू चक्रवर्ती हे सांभाळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)